साबुदाणा चकली उपासाला चालते आणि बच्चे कंपनीला तर फारच आवडते.
साहित्य:
कृती:
- साबुदाणा- १ कप
- उकडलेले बटाटे, किसून- ३
- लाल मिरची पूड- २ टिस्पून
- जिरे- १ टिस्पून
- मीठ- चवीनुसार
कृती:
- साबुदाणे धुवुन ८-१० तास किंवा रात्रभर २ कप पाण्यात भिजवून ठेवा.
- एका वाडगयात भिजवलेला साबूदाणा, किसलेले बटाटे, लाल मिरची पूड, जिरे, मीठ एकत्र करा. चांगले मळून घ्या.
- चकली साचा वापरून प्लास्टिक पेपरवर चकल्या पाडा. (छोट्या चकल्या बनवा, तळलेल्या चकल्या खूप फुलतात.)
- कडक उन्हात ४-५ दिवस किंवा पूर्णपणे कोरड्या होईपर्यंत वाळवा.
- हवाबंद डब्यात भरून ठेवा.
- जेंव्हा हव्या तेव्हा तळा, कुरकूरीत आणि चवदार साबुदाणा चकली तयार.
टिपा:
- मळलेले पीठ खूप सैल वाटत असेल तर, थोडेसे वरीचे पीठ घालावे.
- चकल्या निट पडत नसतील किंवा तुमच्याकडे चकली साचा नसेल तर छोटे छोटे सांडगे बनवा आणि वाळवा.
आहा, माझ्या आवडत्या चकल्या :-). करुन बघेन मी यावेळेला. पण कडकडीत ऊन फार कमी वेळा पडतं इथे.
ReplyDelete