Tuesday, January 28, 2014

मटकीची उसळ

'मटकी' सर्वांच्या आवडीची असते, ती कुठल्याही पद्धतीने करा चांगलीच लागते. मग माझी ही पद्धत पण एकदा वाचून पहा.....    



साहित्य:
मोड़ आलेली मटकी - २ कप
कांदा -२ मध्यम
टोमाटो- २ मध्यम
मिरची पूड- २ चमचे
हिरवी मिरची ,आले,लसून पेस्ट - २ चमचे
काळा  किंव्हा गोडा मसाला - २ चमचे
फोडणीसाटी तेल, मोहरी , जीरे, हळद, हिग
मीठ, चवीनुसार
खवलेले ओले खोबरे आणि कोथिंबीर- आवडीप्रमाणे

कृती :
कढईत तेल गरम करून फोडणी करावी.त्यात कांदा लाल होईपर्यंत परता ,मग त्यात हिरवी मिर्ची,आले ,लसून पेस्ट घालून अजुन थोड़े परता ,आता त्यात बारीक़ चिरलेला टोमाटो ,मि.पूड, , हिंग, हळ्द, मसाला परतून घ्या त्यानंतर टोमाटो शिजेपर्यंत परता .आता त्यात मटकी आणि चवीपुरते मीठ घाला व मटकी शिजेपर्यंत शिजवा. वरून आवडत असल्यास ओले खोबरे आणि कोथिंबीर टाकू शकता.
उसळीला रस्सा करायचा नसतो, सुकीच ठेवायची असते. पण तुम्हाला हव असल्यास तुमच्या पसंती नुसार रस्सा ठेवा.
अश्याप्रकारे मुग, मसूर, काळे हरभरे, कुळीथ यांना मोड आणून उसळी करू शकता . 

Saturday, January 25, 2014

उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी /सांजोरी /खांटोळी

किती सोप्पी आणि सहज घरात असणाऱ्या पदार्थांपासून होणारी ही पाककृती. पण उपवास म्हटला की आपण साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा याच्या पलीकडे जाताच नाही. उपवासाच्या दिवसात पोटाला आराम देणारी आणि तेलकट नसलेली एक छानशी पारंपारिक आणखी एक विस्मृतीत गेलेली आजीची पाककृती.......
ज्या दिवशी उपास नसेल तेव्हा हा पदार्थ तांदुळाच्या रव्यापासून पण बनवला जातो.


साहित्य:
  • वरीचे तांदूळ- १ कप 
  • साखर किंव्हा चिरलेला गुळ - १ कप   
  • खवलेले ओले खोबरे- १ कप  
  • वेलची पूड- १ टीस्पून   
  • साजूक तूप- २ टीस्पून 
  • पाणी- १ १/२ कप  
कृती:
  • वरी तांदूळ निवडून, धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत. पूर्ण निथळून द्यावेत.  
  • एकीकडे पाणी गरम करत ठेवावे. 
  • नॉन-स्टीक  कढईत तूप गरम करून धुतलेले वरीचे तांदूळ गुलाबी रंगावर परतून घ्यावेत.
  • त्यावर उकळते पाणी घालून हलवावे. झाकण ठेऊन दोन वाफा काढाव्यात. 
  • वरी तांदूळ शिजले की ओले खोबरे, साखर किंव्हा गुळ, वेलची पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेऊन वाफ काढावी. 
  • थाळीला तूप लाऊन शिजलेले मिश्रण थापावे. 
  • थोडे थंड झाले की त्याच्या वड्या कापाव्या.      

Sunday, January 19, 2014

Upavasache Thalipeeth (उपवासाचे थालीपीठ)

झटपट होणारं खुसखुशीत चविष्ट उपासाच थालीपीठ, माझी मुलगी तर या थालीपीठासाठीच उपवास करायला तयार असते......  


Read this recipe in English..... click here. 

उपवासाची भाजणी :
साबुदाणा - १ किलो
वरी तांदूळ  - १ किलो
राजगिरा - ५०० ग्रॅम
जीरे - १०० ग्रॅम

साबुदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.
जीरे न भाजताच घालावे.
सर्व जिन्नस एकत्र करावे. मिक्सरमध्ये बारीक करावे किंवा गिरणीतून सरसरीत दळून आणावे.

उपवासाची भाजणी बाजारात पण मिळते.  त्यापासून तुम्ही उपवासाचा उपमा, वडे  बनऊ शकता. 
आता आपण यापासून थालीपीठ कसे बनवायचे ते पाहू ……….    

साहित्य:
  • उपवासाची भाजणी - १ १/२ कप 
  • उकडलेले बटाटे- २ मध्यम 
  • शेंगदाण्यांचा कूट- २ ते ४ टेबलस्पून 
  • मिरची पूड- १ टीस्पून 
  • साखर- १/२ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • पाणी किंव्हा ताक - १/२ कप 
  • तेल किंव्हा तूप तळण्यासाठी - आवश्यकतेनुसार 

कृती:
उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
भाजणी, बटाटे, मिरची पूड, शेंगदाण्याचा कूट, साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
पाणी किंव्हा ताक घालून मळून घ्यावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
नॉनस्टीक तव्याला तेलाचा/तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
छीद्रात थोडे तूप सोडावे. मध्यम आचेवर  थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. 
दही किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते. 


Thursday, January 16, 2014

वांग्याचे तवा भरीत

'वांग्याचं भरीत आणि भाकरी' ही तर आहे अस्सल गावरान मेजवानी. भरीत साधारणपणे सर्व पदार्थ हाताने एकत्र करून केल जात पण तव्यात परतलेल आहे म्हणून तव भरीत.  
प्रत्येक प्रांतातलं भरीत चवीला वेगळ लागत. याच कारण म्हणजे तिथली खासियत असणारी वांगी, त्यांचे मसाले आणि करणाच्या पद्धती. पण कुठल्याही पद्धतीच भरीत छानच लागत मग ते खानदेशी असो नाहीतरी कृष्णेच्या काठावरच असो.... काय?  
     

Read this recipe in English....... 

साहित्य:
मोठे वांगे- १
मोठा कांदा, चिरून - १
मध्यम टोमाटो- १ (ज्यांना आवडतं नसेल त्यांनी नाही वापरला तरी चालेल)
हिरव्या मिरच्या, कापून - ५ ते ६
लसूण पाकळ्या, ठेचून - ७ ते ८
राई - १ टीस्पून
हळद- १/२  टीस्पून
हिंग- १/२  टीस्पून
तेल- ३ टेबलस्पून
कोथिंबीर- मुठभर

कृती:
तेलाचा हात लाऊन वांगी  भाजून घ्यावीत.
वांगी गार झाल्यावर सोलून घ्यावीत. आतमध्ये कीड नाही न ते पाहून घ्यावे व चिरून घ्यावे.
खोलगट तव्यात किंव्हा प्यानमध्ये तेल गरम करून राई, लसुन, मिरची ची फोडणी करून कांदा परतवून घ्यावा. त्यात हळद, हिंग टोमाटो घालून परतवून  शिजून घ्यावा. त्यात वांगे व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे. वरून कोथिंबीर  घालावी .
गरम गरम भाकरीसोबत वाढावे.

ज्यांना जास्त तिखट आवडत असेल त्यांनी मिरची लसुन एकत्र वाटून घेऊन वापरावा, त्यामुळे जास्त खमंगपणा येईल.
मिरची एवजी कोल्हापुरी मसाला, कांदा-लसुन मसाला किंव्हा कुठलाही तिखट मसाला वापरायला हरकत नाही.



Saturday, January 11, 2014

Thecha (ठेचा)

ठेचा ……… भाकरी, पिठलं, भरीत असाल की जोडीला ठेचा हवाच. आणि तो होतोही पटकन. भाकऱ्या करून झाल्या की तवा  गरम असतानाच  तेल घालायचं सगळे जिन्नस त्यात परतायचे. माझी आई तर तो तव्यातच ठेचून करायची, खल-बत्त्याची  पण जरूर नाही. आणि बर का हा असा ठेचून करतात म्हणूनच तर याच नाव ठेचा आहे.



 
Read this recipe in English ..........click here.

साहित्य:


  • हिरव्या मिरच्या- ३ ते ४ (किंव्हा तुम्हाला झेपतील तेवढ्या )
  • लसुण पाकळ्या- १०
  • शेंगदाणे - १/४ कप 
  • कोथिंबीर- थोडीशी 
  • मीठ- चवीप्रमाणे 
  • तेल- १ चमचा 




कृती:
तव्यात तेल गरम करून त्यात एक एक करून सर्व जिन्नस परतउन घ्या आणि नंतर मीठ घालून ठेचा. झाल की….
भाकरीबरोबर झक्कास.
करून ठेऊ नका,  ताजा बनवा आणि ताजाच खा. फ्रीज मध्ये ठेवला तर टिकतो पण चव जाते.    






Thursday, January 9, 2014

Kalanyachi Bhakari aani Varhadi Thecha (कळण्याची भाकरी आणि वऱ्हाडी ठेचा)

या भाकरीला काही ठिकाणी कळव्याची भाकरी असेही म्हणतात. कळण्याच्या भाकरीसोबत भरपूर लाल तिखट व तेल घालून केलेली कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी किंव्हा भरपूर हिरव्या मिरच्या आणि मटार घालून केलेले  वांग्याचे भरीतही छान लागते. कळण्याची भाकरी, वऱ्हाडी ठेचा आणि थंडगार मठ्ठा हा वऱ्हाडातला  आवडता बेत.


कळण्याचे पीठ :
  • ज्वारी -१ किलो
  • अख्खे उडीद किंव्हा अख्खे मुग-पाव किलो
  • मेथी दाणे- १ छोटा चमचा/ टीस्पून   
  • जाडे मीठ- चवीनुसार / १ टीस्पून
एकत्र चक्कीवरून दळून आणावे
.
साहित्य: 
  • वरील तयार पीठ- २ वाट्या 
  • धने-जीरे पूड- १ चमचा 
  • दही - १ वाटी 
कृती:
  • प्रथम कळण्याच्या पीठामध्ये इतर सर्व जिन्नस कालवून घ्यावेत. 
  • तयार पिठाची भाकरी थापून चांगाली खरपूस भाजून घ्यावी.
  • ही भाकरी दही व धने-जीरे पूड न घालता फक्त पाणी  वापरून सुद्धा करतात. 
  • ह्या भाकरी यासोबत शेंगदाण्याचा ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी (त्यावर तेलाची धार)  छान लागते. 
  • हल्ली या पिठाच्या पुऱ्या पण करतात. वरील प्रमाणे कणिक तयार करून छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्यात आणि तेलात खरपूस लाल तळाव्यात.   

वऱ्हाडी ठेचा :
साहित्य- १ गड्डी लसूण , १५ ते २० सुक्या लाल तिखट मिरच्या , २ चमचे सुके किसलेले खोबरे , चवीनुसार मीठ , अर्धी वाटी तेल. 
मिरच्या १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा नंतर तेल सोडून वरील सर्व जिन्नस एकत्र वाटावे , नंतर ती चटणी तेलात खमंग परतावी........वऱ्हाडी ठेचा तयार.


मठ्ठयाच्या पाककृती साठी इथे क्लिक करा. 
ठेचाच्या पाककृतीसाठी  इथे क्लिक करा.  
वांग्याच्या भरीताच्या पाककृतीसाठी इथे क्लिक करा.  

Wednesday, January 8, 2014

Tilgul (तीळगुळ)

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तीळगूळ घ्या गोड गोड बोला !!



Read this recipe in English........click here.


साहित्य:
  • तीळ (पॉलीशचे) - ५०० ग्रॅम 
  • चिक्कीचा गूळ- ५०० ग्रॅम 
  • शेंगदाणे- २०० ग्रॅम 
  • सुके खोबरे- १ वाटी/ कवड 
  • वेलची पूड- २ टिस्पून 
  • साजूक तूप- २ टिस्पून 

कृती: 
  • सुक्या खोबऱ्याच्या वाटीची बाहेरची बाजू किसून त्याचा काळा भाग काढून टाका. नंतर किसा, त्यामुळे पांढरे शुभ्र खोबरे मिळेल. मंद आचेवर नकरपवता हलकेसे भाजून घ्या. 
  • शेंगदाणे भाजून, सोलून घ्या. भरड कुट करा. मी त्यासाठी लाटणे वापरते. 
  • तीळ खमंग भाजून घ्यावेत. 
  • तीळ, शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि वेलचीपूड परातीत एकत्र करा. चांगले मिसळून ठेऊन द्या. 
  • जाड बुडाच्या कढईत किंव्हा नॉन-स्टिक पॅन मध्ये, २ टेस्पून तूप गरम करून गूळ घालावा. आच मध्यम असावी. 
  • सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो. नंतर त्याला उकळी येउन रंग बदलू लागेल, साधारण लालसर होऊन गुळाचा छान वास येऊ लागेल. आच कमी असावी. 
  • पाक तयार झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा जरासा पाक चमच्याने बाहेर काढून अंदाज घ्यावा. एकतारी पाक तयार व्हायला हवा. किंव्हा त्या पाकाची कडक गोळी झाली पाहिजे तर पाक तयार आहे असे समजावे. 
  • पाक झाला की त्यात तीळ, शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि वेलचीपूड चे मिश्रण घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत, नाहीतर लाडू वळले जात नाहीत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही. 
  • मिश्रण थंड होऊ लागले तर जाड तवा गरम करा. नंतर गॅसची आच मंद करून तव्यावर मिश्रणाची कढई ठेवा. तिळगुळाचे मिश्रण सैल होऊ लागेल.  
  • सर्व लाडू वळून घ्या व त्यांना थंड होऊ द्या. नंतरच हवाबंद डब्यात भरून ठेवा. 

टीप: भाजताना काहीही जळऊ नका कारण तीळगुळात जर काळा भाग असेल तर चांगला दिसत नाही.