Wednesday, May 29, 2013

चिली ब्रोकोली चायनीज स्टर फ्राय


Read this recipe in English........
साहित्य:
ब्रोकोलीचे तुरे- १ कप
उभा चिरलेला कांदा- १ कप
उभा चिरलेली सिमला मिरची- १ कप
उभे चिरलेले गाजर- १/२ कप
चिली सॉस- १ टीस्पून
सोया सॉस  - २ टीस्पून
व्हिनेगर- १ टीस्पून
लाल मोठ्या मिरच्या- २ 
लसुन पाकळ्या- ६
बारीक चिरलेले आले- १ टीस्पून
मीठ आणि मिरपूड- चवीप्रमाणे
तेल- २ टेबलस्पून

कृती:
एका बाउल मध्ये सर्व सॉस आणि मीठ व मिरपूड एकत्र करावे. त्यात ब्रोकोलीचे तुरे टाकून १५ मिनिटांसाठी मुरत ठेवावेत.
एका प्यान मध्ये तेल गरम करून त्यात वरील ब्रोकोली, बारीक चिरलेला लसुन, आल, मिरच्यांच्या चकत्या व उर्वरित सर्व भाज्या टाकून ८-१० मिनिटे परतावे .
फ्राईड रेस किंव्हा नूडल्स सोबत गरमागम वाढावे.

Saturday, May 25, 2013

Palak Oats Uttapa (पालक ओटस उत्तपा)

आम्हा आयांना ही नेहमीच चिंता असते कि मुलांना ओटस आणि पालक सारख्या पालेभाज्या कश्या खाऊ घालाव्या. मला वाटते कि हा त्यावरील एक उपाय आहे. शिवाय हा एक हेल्दी नाश्ता आहे.


Read this recipe in English.... click here.

साहित्य:
चिरलेला पालक - १ कप
चिरलेला कांदा- १/२ कप
ओटस- १ कप
बारीक रवा- १ कप
लसूण आणि मिरची ठेचा - ३ ते ४ टीस्पून
जिरे पावडर- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
साखर- १/२ टीस्पून
दही- १/४ कप
खाण्याचा सोडा- चिमुटभर
पाणी- अंदाजे २ कप
मीठ चवीप्रमाणे
तळ्ण्यासाठी तेल

कृती:
एका बाउल मध्ये ओटस  आणि रवा गयाव. त्यात दही व पाणी घालून चांगले फेटावे. या एवजी २ कप आंबट ताक सुद्धा चालेल.
ते मिश्रण एक तासासाठी तसेच ठेवावे. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे. चांगले फेटून घ्यावे.
तव गरम करून त्यावर थोडे तेल घालावे. वरील मिश्रणाचे उत्तपे घालावे. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
टोमतो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.

ह्या मिश्रणाचे तुम्ही अप्पे सुद्धा करू शकता.
ह्यामध्ये पालक एवजी दुसऱ्या तुमच्या आवडीच्या भाज्या वापरता येतील.
लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा एक छान आणि झटपट प्रकार आहे. 

Thursday, May 23, 2013

Phanasache Vade/Aambode (कच्च्या फणसाचे वडे/आंबोडे)

कोकणात कच्च्या फणसापासुन अनेक पदार्थ केले जातात. त्यात मी अजून एका पदार्थाची भर टाकली आहे. दक्षिण कोकणात याला 'आंबोडे' म्हणतात. फरक एवढाच की मी त्यात कच्चा फणस घातला आहे. तसेच ते तळलेले (डीप फ्राय केलेले) असतात, मी शालो फ्राय केलेत आणि थोडेफार बदल केले आहेत.


Read this recipe in English... click here.

साहित्य:
  • कच्चा फणस ( सोलून उकडलेला व कुस्करलेला )- १ १/२  कप
  • चणा डाळ - १/२ कप
  • जिरे- २ टीस्पून
  • धणे- १/४  टीस्पून
  • हिरव्या मिरच्या - ६ ते ८
  • चिरलेली कोथिम्बिर- १/२ कप
  • कॉर्न फ्लोअर- २  टेबलस्पून
  • हळद- १/२  टीस्पून
  • हिंग- १/४  टीस्पून
  • चाट मसाला- १  टीस्पून
  • आमचूर- १/२  टीस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे
  • तेल - २ टेबलस्पून


कृती:
  • कच्चा फणस वापरण्यासाठी काय पूर्वतयारी  लागेल हे आपण मागच्या पोस्ट (फणसाची भाजी) मध्ये पाहिलं.
  • चण्याची डाळ ४-५ तास भिजत घाला. नंतर उपसून ठेवा.
  • कुस्करलेला फणस फूड प्रोसेसर मधून पाण्याशिवाय बारीक करून घ्या किंवा एकदम बारीक चिरा. 
  • चण्याची डाळ, जिरे, धणे, कोथिम्बिर, मिरची एकत्र पाणी न घालता वाटून घ्या.
  • फणस, वाटलेली डाळ. हळद, हिंग, आमचूर, मीठ आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे वडे तयार करा. 
  • थोड्याश्या तेलावर शिजेपर्यंत किंवा १५ मिनिटे परतून (shallow  fry ) घ्या. 
  • पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमागरम वाढा.