Thursday, February 28, 2013

Takatale Ghavan (ताकातले घावन किंव्हा तांदळाचं धिरडं)

या घावण्याला धिरडे असेही म्हणतात. माझं बालपण मुरुड सारख्या एका गावात गेले. फारस बाहेरचं खायला मिळायचं नाही. आजच्या सारखे बिस्कीट, फरसाण वै. सारख्या पदार्थांनी डबे भरलेले नसायचे. खेळून आलो किंव्हा शाळेतून आल्यावर आई पटकन काहीतरी गरम गरम खायला करायची त्या पैकीच हा एक पदार्थ आहे. खरतरं न्याहारीचा हा पदार्थ पण केव्हाही खाता येण्यासारखा. 
     

Read this recipe in English......click here.

साहित्य:
तांदुळाचे पीठ- १ कप (पीठ मध्यम  असावे, फार बारीक दळू नये )
आंबट ताक- १/२ कप
पाणी- ३/४ कप (थोडेफार कमी-जास्त पाणी लागेल, सरसरीत असावे)
लसुण पाकळ्या - ३ ते ४
जीरे- १ टीस्पून 
हिरव्या  मिरच्या- २
मेथी पूड- चिमुटभर  (ऐच्छिक) 
मीठ- चवीनुसार 
तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
मिरच्या, लसुण आणि जीरे खडबडीत वाटून घ्यावी. फार तिखट आवडत नसेल तर मिरची न वाटता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. म्हणजे सहज बाजूला काढता येतील.
पीठ, लसून-मिरचीचा ठेचा, ताक, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे.
सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात. 
नॉन-स्टीक डोसा तवा किंव्हा बीडाची कावील गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. वाटीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. कडेने थोडेसे तेल सोडावे.
झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा १-२ मिनिटे भाजावे.
गरम गरम टोमाटो केचप सोबत वाढावे अथवा नुसतेच खावे.

Wednesday, February 27, 2013

Cheesy Masti (चीजी मस्ती)

मी फार पूर्वीपासूनच नवनव्या रेसिपी करते पण गेल्या वर्षी एका स्पर्धेसाठी ही पाककृती बनवली, लिहिली आणि तिचा फोटो काढला. मग मला पाककृती लिहिण्याचा छंदच लागला. नंतर मी माझे फेसबुक वर एक पेज बनवले. नंतर वाचकांच्या सुचनेवरून मी माझा इंग्लिश ब्लॉग बनवला आणि मराठी वाचकांच्या आग्रहास्तव हा मराठी ब्लॉग आजपासून खास तुमच्यासाठी सुरु होत आहे. तर मग पहिला मान माझ्या या पहिल्या वहिल्या पाककृतीला. 

Recipe in English, click here.


डबल चीज आणि पालक ब्रेड रोल 
साहित्य:
 • उभा कापलेला पालक -२ कप 
 • उकडलेले मक्याचे दाणे- १ टेबलस्पून 
 • मोझ्झेरेल्ला चीज- १ कप 
 • प्रोस्सेड चीज- १/२ कप 
 • बारीक चिरलेला लसुन- ६ पाकळ्या 
 • ओरेगनो- १ टीस्पून
 • काळी मिरी पूड- १ टीस्पून 
 • मीठ- चवीप्रमाणे 
 • ऑलिव तेल किंव्हा बटर - २ टीस्पून 
 • तेल (तळण्यासाठी)- आवश्यकतेनुसार 
 • ब्रेड स्लाइस -आवश्यकतेनुसार
कृती :
 • एका पॅनमध्ये ऑलिव  तेल गरम करून त्यात लसूण  जरासा परता. 
 • त्यात कापलेला पालक, मक्याचे दाणे, ओरेगनो, मिरपूड आणि मीठ टाका. ३ ते ४ मिनिट परता. 
 • थंड झाल्यावर त्यात दोन्ही चीज घालून व्यवस्थित एकत्र करा.
 • ब्रेडच्या कडा काढून टाका. एक स्लाइस पाण्यात किंव्हा दुधात बुडून लगेच हातावर घेऊन दाबा. त्यात तयार केलेले सारण  भरून त्याला रोलचा आकार द्या. अशाप्रकारे सर्व रोल करून घ्या.
 • गरम तेलात सोनेरी रंगावर तळून काढा. चटणी आणि केचप बरोबर गरमागरम खा.

चीजी नुडल
साहित्य:
 • नुडल- २०० ग्रॅम 
 • प्रोस्सेड चीज - २ क्युब 
 • क्रीम- १/४ कप (घरातील घट्ट साय देखील चालेल)
 • दही- १/४ कप 
 • उभा चिरलेला कांदा- १ कप / १ मध्यम आकाराचा 
 • उभा चिरलेली भोपळी मिरची - १ कप / १ मध्यम आकाराचा 
 • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून 
 • मीठ- चवीप्रमाणे 
 • मिरपूड- चवीप्रमाणे 
 • टोमॅटो केचप - सजावटीसाठी 
कृती :
 • मीठ आणि थोडेसे तेल टाकून पाणी उकळत ठेवा. त्यात नुडल्स टाकून शिजून घ्या.
 •  पॅनमध्ये बटर गरम करून त्यात लसुन, भोपळी मिरची आणि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मीठ आणि मिरपूड टाका. 
 • नुडल्स आणि चीज टाकून एकत्र परतून घ्या.
 • दही आणि क्रीम एकत्र फेटून त्यात घाला व एकत्र करा. कोथिंबीर आणि टोमॅटो केचप ने सजवा. 

चीजी लेअर सलाड 
साहित्य:
 • उकडलेले मक्याचे दाणे- १ टेबलस्पून 
 • कांदा आणि टोमॅटो- प्रत्येकी २ कप 
 • चीज स्लाईस - १
 • बारीक कापलेली भोपळी मिरची - १ टेबलस्पून
ड्रेसींग:
 • ऑलिव ऑईल- १ टीस्पून
 • बाल्सामिक व्हिनेगर - १/२ टीस्पून
 • टोबास्को सॉस- १/२ टीस्पून
 • काळी मीरी पूड- १/४ टीस्पून
 • लिंबाचा रस- १/२ टीस्पून
 • मीठ- चवीनुसार
कृती:
ड्रेसींगचे सर्व पदार्थ एकत्र करून छान ढवळा. एका डीश मध्ये कांद्याची चकती त्यावर टोमॅटोची चकती, त्यावर चीजची अर्धी स्लाईस ठेवावी. त्यावर थोडेसे मक्याचे दाणे आणि कापलेली भोपळी मिरची ठेवा. त्यावर थोडे ड्रेसींग टाका.


चीज चिप्स
एक पॅन गरम करा. त्यावर किसलेले चीज पसरवा. लगेच गॅस बंद करा. चीजवर लाल मिरची पूड भुरभुरा. थंड झाल्यावर चीज एकत्र होऊन पापुत्रा होईल. हळूहळू पॅनपासून सोडवा. चिप्स सारखे दिसेल.

हिरवी पेस्तो चटणी- पुदिना, कोथिम्बिर, मिरची, साखर, लिंबू रस, काजू आणि मीठ एकत्र वाटा. त्यात थोडेसे चीज स्प्रेड मिसळा.

जादुई टोमॅटो सॉस-  टोमॅटो केचप , चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब आणि चीज स्प्रेड एकत्र करा.